कोसारीत राजमातेच्या जयंतीदिनी कर्तुत्ववान नारींचा सन्मान

मोफत आरोग्य तपासणी शिबीर
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

कोसारी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच गावाच्या लौकिकात भर घालणाऱ्या डॉक्टर व पोलीस या रणरागिणींचा सत्कार करण्यात आला.
शिबिरामध्ये डॉ. प्रशांत चिक्कोडी, डॉ. मकसुद मुनिर तांबोळी,विजय सावंत वैद्यकीय प्रतिनिधी, अतुल यमाजे व त्यांच्या टिमच्या वतीने आज १६१ रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.यावेळी कोसारी सोसायटीचे नूतन चेअरमन किसन टेंगले, उत्तम महारनुर, संभाजी टेंगले,विलास कदम, विकास महारनुर, सिध्दु महारनुर, सचिन खडतरे, लतिफ मणेर, संजय वाघमोडे, प्रल्हाद कुंभार, मधुकर तोरवे, संभाजी संकपाळ तसेच सोसायटी संचालक आजी माजी पदाधिकारी, व राजमाता प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विशेष म्हणजे कोसारी गावची मान उंचावणारे दोन रणरागिणींनी मान मिळाला आहे. त्यामध्ये डॉ. उज्वला लोखंडे हिने बी. ए. एम. एस पदवी प्राप्त केली अन् कोसारीची पहिली महिला डॉक्टर बनण्याचा मान मिळवला व गावातील नकुशा रुपनर मुबंई पोलीस होण्याचा मान मिळवला. या दोन रणरागिणींचा सत्कार राजमाता प्रतिष्ठान कोसारीच्या वतीने सत्कार करण्यात आला.