प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे कोर्ट इमारतीच्या पाठीमागील भवानीनगर येथे बंद फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून लंपास केला आहे.आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील कोर्टाच्या इमारतीच्या पाठीमागे भवानीनगर येथील अरुणोदय बिल्डिंगमध्ये गोरख खंडू गायकवाड (वय ५१ वर्षे) राहतात. शनिवार दि. २९ मे रोजी रात्री १०.०० नंतर व ३० मे रोजी सकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत गायकवाड भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटच्या दरवाज्याची कडी
तोडून, घरामधील कपाटाचे लोकर तोडून विविध प्रकारच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. यामध्ये ७३ हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद गोरख गायकवाड यांनी आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे व पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या