अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
शहरातील विठ्ठलनगर येथील मुस्लिम कब्रस्तानमधील विद्युत मोटर व केबल असे एकूण वीस हजाराचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी रसुल महेबूब नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शहरातील विठ्ठलनगर येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची देखरेख रसूल नदाफ करत असतात. नदाफ यांनी गुरुवारी सकाळी सात वाजता कब्रस्तानमधील विद्युत मोटर चालू करून झाडांना पाणी घातले होते. नंतर ते त्यांच्या शेतात कामाकरिता गेले होते. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास असलम जवळेकर व रसूल नदाफ कब्रस्तान येथे आले होते. यावेळी बोरमधील पाईप, दोरी विस्कटलेली दिसली. बोरमधील सबमर्सिबल विद्युत मोटर व केबल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सदरच्या विद्युत मोटर व केबलची वीस हजार इतकी किंमत आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या