जत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.३० रोजी सकाळी ठीक ९ वाजता शिवाजी पेठ येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १० वा. वृक्षारोपण करण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी ७वा. भव्य धनगरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम शिवाजी पेठ जत येथे संपन्न होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी सकाळी महिलांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता जत शहरातून भव्यदिव्य अशी मिरवणुक आयोजित केली आहे.
सर्व कार्यक्रमासाठी जत शहर तसेच तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.