आटपाडी तालुक्यातील तिघाजणांची टोळी तडीपार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील करगणी व बनपुरी येथील तिघाजणांची टोळी सांगली,सातारा,सोलापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. आटपाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित उर्फ अविराज दिपक मोहिते (वय 20 रा.करगणी, टोळी प्रमुख), लखन उर्फ लक्ष्मण शहाजी चव्हाण (वय 22 रा.बनपुरी) व विजय सुखदेव निळे (वय 24 रा.करगणी) यांच्याविरुद्ध मोटारसायकल चोरी तसेच घरफोडी अशा प्रकारचे मालमत्ते विरुद्धचे सहा गुन्हे आटपाडी पोलीस ठाणे तसेच इतर पोलिस ठाणेमध्ये दाखल होते.हे आरोपी कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी करिता सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या अनुषंगाने या तिघांच्या टोळीस सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस नाईक उमर फकीर, पोलीस हवालदार प्रमोद रोडे यांनी ही कारवाई केली.