रेठरेहरणाक्ष येथे यात्रेकरुंसाठी पानपोई !

श्री सद्गुरु जंगली महाराज भंडाऱ्यानिमित्त पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था,चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघटनेचा उपक्रम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
रेठरेहरणाक्ष

श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या भंडारा निमित्त मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येतात. या यात्रेकरूंना मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात थंड व फिल्टर पाण्याची नितांत गरज असते.येणाऱ्या यात्रेकरूंची ही अडचण ओळखून पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था व चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघटना रेठरेहरणाक्ष या संस्थेने गावात पानपोईची सुविधा उपलब्ध करून दिली.
या पाणपोईचे उद्घाटन ह.भ.प., ज्येष्ठ नागरिक भानुदास अण्णा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गावातील सर्व जेष्ठ नागरिक,ज्येष्ठ महिला,ज्येष्ठ नागरिक मित्र,गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
हा कार्यक्रम अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा, पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था, चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघटना रेठरेहरणाक्ष यांनी आयोजित केला. याप्रसंगी जगन्नाथ मोरे पाटील ,चंद्रशेखर मोरे ,दिलीप मोरे, धनाजी बीरमुळे, डी.के.मोरे, निवास शिंदे, विलास माळी, एन.डी.माने,वसंत गोंदिल, राजाराम पवार,संपत शिंदे, विकास कुंभार, कृष्णा कोळेकर, तानाजी थोरात, शहाजी सत्रे, लक्ष्मण मोरे, प्रल्हाद कांबळे, हसन अकोळकर ,मल्लेश पवार ,सरदार नदाफ, नामदेव कोळेकर ,प्रकाश थोरात , श्रीपती कांबळे, निवृत्ती पवार, वसंत पवार ,शामराव पवार, पांडुरंग पवार, किसन सावंत ,आकाराम शिंदे, संपत कोळेकर ,निवास माने तसेच जेष्ठ महिला श्रीमती छबुताई मोरे, हिराबाई मोरे ,प्रभावती जाधव, सुष्मा मोरे, यशोदा मोरे, रंभा थोरात, गंगुबाई गोंदील, पुष्पा पवार ,बनुबाई निकम, सुशीला ठाकर, पुतळाबाई बेले, बयाबाई कांबळे ,पमाबाई कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.