सोरडी येथील आरोपीची विष प्राशन करून आत्महत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर बाहेर आलेला आरोपी शशिकांत विठ्ठल शितोळे (वय ३३, रा. सोरडी, ता. जत) याने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आरोपी शितोळे याने जमिनीच्या वादातून २०१४ साली खून केला होता. या खून प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दीड महिन्यांपूर्वी तो पॅरोल रजेवर आला होता. रजेवर आल्यानंतर पत्नीबरोबर वाद झाला होता. शुक्रवारी शितोळे याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. शितोळे याच्या मृतदेहाचे मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.