अवैध वाळू वाहतूक करणारांच्या माळशिरस पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुका हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह अन्य दोघांच्या माळशिरस पोलिस यांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य एक साथीदार फरार झाला आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस हवालदार संतोष घोगरे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रिपर चालक धनाजी उर्फ विश्वनाथ शिंदे रा.सदाशिवनगर, अरिफ मोहम्मद शेख रा.पुरंदावडे, अविनाश संजय वाघमोडे रा.जाधववाडी,शंकर उर्फ शाखा उर्फ दत्तात्रय कर्चे रा. पिंपरी यांच्यावर माळशिरस पोलिसांनी गुन्हा नोंद केला.या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनायक राजेंद्र चौगुले यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे या चार आरोपींच्या नावे ३५ लाख रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टिपर ( हायवा ) त्यावर आरटीओ पासिंग नसलेला असा ट्रिपर, ४२ हजार किंमतीची सहा ब्रास वाळू भरलेली शासनाचा कोणताही पास, परवाना न घेता सदर वाळूची चोरी करून चोरटी वाहतूक केली आहे, असा गुन्हा नोंद केलेला होता.
या गुन्ह्यातील तीन आरोपींना दि.१५ मे रोजी अटक करून कोर्टासमोर हजर केले.त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली.
माळशिरस तालुक्यात अवैध वाळू उपसा व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार आहेत.