अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील शेगाव येथे तीन दुकान फोडीतील संशयित आरोपी महादेव रंगनाथ पवार (वय ४९, रा. माळीनगर ता. माळशिरस) यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेगाव येथे दि. २३ व २४ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री किशोर गिफ्ट सेंटर, यशराज फुटवेअर व श्रीराम इलेक्ट्रिकल्स अशी तीन दुकाने फोडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.यातील एक आरोपीस महादेव पवार यास अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दिनांक ११ मे रोजी मध्यरात्री विजापूरहुन जतकडे हा आरोपी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यास पकडण्यात आले. त्याच्याजवळील ६०० रुपयांची कॉपर वायर व तवेरा कार गाडी जप्त करण्यात आली आहे. पवार या आरोपी सोबतच रामा काळे (रा. उस्मानाबाद) हा आरोपी होता.मात्र तो पोलिसांच्या कचाट्यातून परागंदा झाला आहे. अधिक तपास हवालदार गोडसे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या