प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील एसटी स्टँड नजीक असलेल्या एलआयसीच्या कार्यालयामधून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे साहित्य चोरल्याची घटना रात्री घडली घडली. याबाबतची फिर्याद शाखाधिकारी अमित देशमुख यांनी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी एसटी स्टँडच्या पश्चिमेस एल.आय.सी.चे शाखा कार्यालय आहे. त्यामधील पंधरा हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा सीसीटीव्ही,एनव्हीआर सॅमसंग कंपनीचे त्यातील हार्डडिस्क डब्ल्यू डी या कंपनीचा तिचा कॅपॅसिटी ४ जीबी असा असलेले युवाकिअ १३ मे रोजी सायंकाळी ६.०० ते १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद शाखाधिकारी अमित यशवंतराव देशमुख (वय ४३ वर्षे, सध्या रा.विद्यानगर,आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली, मूळ रा. जवाहरनगर, अकोला जि. अकोला) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ठोंबरे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या