पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आमंत्रण दिले नसल्याच्या कारणावरून घडली घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील डॉ.दिलीप पवार यांचे थोरले भाऊ हनुमंत पवार यांचा पुणे येथे पुस्तक प्रकाशन सोहळा होता. याबद्दल निमगावचे आप्पासाहेब मगर यांना आमंत्रण दिले नसल्याच्या कारणावरून आप्पासाहेब मगर यांनी डॉ.दिलीप पवार यांना दि १२ मे रोजी कॉल करून विचारले की इतर लोकांना आमंत्रण दिले व मला आमंत्रण का दिले नाही? म्हणून त्यांनी डॉ.दिलीप पवार यांना कॉलवरच शिव्या देण्यास सुरुवात केली .
त्याचदिवशी दि.१२ मे रोजी सायंकाळी आप्पासाहेब मगर , आण्णा देवकर व निलेश मगर व त्यांच्याबरोबर आलेली १५ ते २० जण ( सर्व राहणार निमगाव )लोक हे सर्व जण डॉ.दिलीप पवार यांच्या हॉस्पिटलला गेले व तेथे असणाऱ्या डॉ.दिलीप पवार यांच्या पत्नी डॉ.वंदना पवार यांना त्यांनी डॉक्टर आहेत का? अशी विचारणा केली असता डॉ वंदना पवार यांनी सांगितले की डॉक्टर पुण्याला गेले आहेत.असे सांगितल्यानंतर आप्पासाहेब मगर व इतर जणांनी मिळून हॉस्पिटलची तोडफोड केली व हॉस्पिटलमध्ये अडमिट असलेल्या रुग्णांनाही शिवीगाळ केली.
डॉ.वंदना पवार हे पेशंटला धीर देत असताना आप्पासाहेब मगर यांनी डॉ.दिलीप पवार यांच्या ड्रॉवरमधील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये व डॉ. वंदना पवार यांच्या ड्रॉवरमधील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये चोरून नेले आहेत व डॉक्टरला येऊ दे मग त्यालाही बघतो. तसेच आप्पासाहेब मगर,आण्णा देवकर व निलेश मगर व त्यांच्याबरोबर आलेली १५ ते २० जण यांनी पवार हॉस्पिटलचे एकूण अंदाजे ७५००० रुपयांचे नुकसान केले आहे.
म्हणून डॉ.दिलीप पवार यांनी माळशिरस पोलीस स्टेशनला या लोकांविरुद्ध दिनांक १२ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता खरात व सतीश धुमाळ करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या