आटपाडी तालुक्यात महिलेचा विनयभंग

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यामध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुधीर हरिबा गळवे (रा.गळवेवाडी ता.आटपाडी जि.सांगली) याच्या विरोधात भा.दं.वि.सं. कलम ३५४(a),(b),३२३,३२४,५०४ प्रमाणे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.संशयित आरोपीने फिर्यादीस ऊसाच्या शेताजवळ शेत काय तुझ्या बापाचे आहे का असे म्हणून फिर्यादीस वाईटवंगाल शिवीगाळ करीत खाली पडलेला दगड उचलून डोक्यात उजव्या बाजूस मारून जखमी केले. त्यानंतर खाली पडलेली काठी उचलून डोक्यात वरील बाजूस मारले. त्यावेळी फिर्यादी महिला खाली पडल्यावर तिच्या छातीवर बसून केस ओढून तोंडावर हाताने मारले.मला मारू नका म्हणून आरडाओरड करत असताना आरोपीने फिर्यादीस ‘तुझा नवरा दारू पितो, मी कोट्याधीश आहे, तू माझ्याशी लगट करून रहा’ असे म्हणून व मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद दिली आहे.पोलीस नाईक लोखंडे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.