प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील करगणी येथे महिलेने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कुसुम दत्तात्रय सरगर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
करगणी येथील गोमेवाडी रस्त्याला असलेल्या चांगभले वस्ती येथे कुसुम दत्तात्रय सरगर (वय ३० वर्षे) या महिलेने आज दि.१२ रोजी १२ वाजण्याच्या पूर्वी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद लक्ष्मण सरगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरवी करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या