प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
म्हसवड येथील वाळू ठेकेदारांकडून एकाच पावतीवर वाळू उपसा करून माळशिरस तालुक्यात वाळूचा धुमाकूळ घातला आहे.माळशिरस तालुक्यातील पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी लक्ष देऊन बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून म्हसवड येथील असा वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराच्या मुसक्या आवळायला हव्यात, अशा मागणीने जोर धरलेला आहे.
म्हसवड येथील वाळूचा लिलाव झालेला आहे. सदरच्या ठिकाणी जोमाने वाळू उपसा सुरू आहे. त्याठिकाणची बेसुमार उपसा केलेली वाळू माळशिरस तालुक्यात येत आहे. एकाच पावतीवर दिवसभर व दुसऱ्या दिवशी वाहनधारक वाळू वाहतूक रात्रंदिवस करीत आहेत. याकडे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते व माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ही वाळू तालुक्यात येत आहे. यासाठी उपविभागीय कार्यालय व नातेपुते आणि माळशिरस पोलीस स्टेशनचे भरारी पथक नेमणे गरजेचे आहे. त्यांच्या जोडीला प्रांताधिकारी व तहसीलदार यांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
एकाच पावतीवर वाहनधारकांनी बेसुमार वाळू उपसा करून माळशिरस तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे. यासाठी वाळू ठेकेदार व वाहनधारक यांच्यावर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे. रात्री-अपरात्री भरधाव वेगाने वाळूची वाहतूक जोमात सुरू आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या