
चौघा जणांकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आटपाडी पोलिस ठाणे हद्दीतील दाखल असलेले चोरी व घरफोडीचे गुन्हे आटपाडी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून व गोपनीयरित्या माहिती काढून उघडकीस आणले आहेत. दौलुशा रामा पवार (वय ६५, रा.सोमेश्वरनगर, आटपाडी) यांच्याकडून सुमारे ३० हजार रुपयांच्या दोन अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या चैन, अमोल विजय पवार (वय २५ वर्षे, रा. मापटेमळा, आटपाडी) याच्याकडून चार हजार रुपयाचे ५० ग्रॅम चांदीचे पैंजण व ५० ग्रॅम चांदीचे निरंजन, कस्तुराबाई भागवत लोखंडे (वय ५० वर्षे, रा.सोनारी ता. परांडा जि. उस्मानाबाद) हिच्याकडून ८२ हजार रुपयाचे साडेतेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व भोजलिंग महादेव तुपे (वय २० वर्षे रा. पानवन, ता. माण जि. सातारा) याच्याकडून ६० हजार रुपयांचे रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल असा एकूण एक लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या चोरीचे गुन्हे आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले व उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस फौजदार पंढरीनाथ भांगरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल गणपत गावडे, अमोल कराळे, पोलीस हवालदार कांबळे, संभाजी सोनवणे यांनी ही कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या