प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
सांगली येथील मारुती चाैक परिसरात माेटारीतून ७५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड सांगली शहर पोलिसांनी जप्त केली आहे.आटपाडी तालुक्यातील आकाश नारायण केंगार (वय २७, रा.आबानगर,आटपाडी), महेंद्र लक्ष्मण जावीर (वय २६ रा.कौठुळी, रा.आटपाडी) व सुनील शहाजी कदम (वय ३५, रा.कौठुळी, रा.आटपाडी) या तिघांना याप्रकरणी माेटारीसह ताब्यात घेतले.सोमवारी दि.९ मे रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्नाटकातील माेटारीतून (केए ५५ एम ८०३७) बेकायदा रोकड वाहतूक केली जाणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सांगलीतील मारुती चाैक परिसरात संशयास्पद माेटार अडवली.माेटारीची तपासणी केली असता एका बॅगेत ७५ लाख रुपयांची रोकड आढळून आली.ती कोणाची आहे किंवा कोणत्या कामासाठी बाळगली आहे, याचा समाधानकारक खुलासा तिघेही करू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. रोकड व माेटार असा ८१ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, झाकीर हुसेन काझी, दीपक कांबळे, अक्षय कांबळे, विक्रम खोत, अभिजित माळकर आदींनी कारवाईत भाग घेतला.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या