अनाथांसंगे साजरा केला लाडक्या चिमुकलीचा वाढदिवस!

गोरडवाडीतील दांपत्त्याचा सातत्यपूर्ण उपक्रम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील ठाणे शहर येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील व रिमा सोमनाथ कर्णवर पाटील यांची मुलगी कु.स्वरांजलीचा सहावा वाढदिवस पंढरपूर येथील पालवी संस्थेमधील मुला-मुलींच्या समवेत साजरा केला.वाढदिवसानिमित्त रिमा सोमनाथ कर्णवर पाटील यांनी पालवी संस्थेतील मुलामुलींना अन्नदान केले.
सहाव्या वाढदिवसप्रसंगी कर्णवर पाटील परिवारातील बाळासाहेब कर्णवर पाटील (व्हाय चेअरमन सदगुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी), सोमनाथ पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर), अजिनाथ कर्णवर पाटील, अमोल कर्णवर पाटील, श्रीमती कमल कर्णवर पाटील , रीमा कर्णवर पाटील, विजया कर्णवर पाटील, साधना कर्णवर पाटील, भाग्यवंत नायकुडे(संस्थापक संपादक अकलूज वैभव), अजित जाधव इत्यादी उपस्थित होते.
पहिला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम टेंभुर्णी, दुसरा वाढदिवस अनाथ आश्रम मालेगाव, तिसरा वाढदिवस पारधी समाजाचे वंचित मुलांमध्ये श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, चौथा वाढदिवस मजुरांना फळे वाटप करून, पाचवा वाढदिवस सत्यभामा अनाथ बालिकाश्रम माणगाव तालुका भिवंडी व सहावा पालवी अनाथाश्रम पंढरपूर याठिकाणी मी माझ्या या मुलीचा वाढदिवस साजरा केला असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील यांनी सांगितले.
कर्णवर पाटील यांनी आपली कन्या स्वरांजली हिचा प्रत्येक वर्षीचा वाढदिवस अशा ठिकाणी साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.