शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे: जलसंपदामंत्री जयंतराव पाटील

आटपाडी येथे जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

बांबू उत्पादनाचे अर्थकारण बघून शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी केले.
आटपाडी येथे माणगंगा उद्योग समूह यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. माजी आमदार सदाशिवराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार बाई माने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विलास काळे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश काका पाटील, कार्याध्यक्ष अँड. बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, विधानसभा मतदार क्षेत्राचे अध्यक्ष सुशांत देवकर,आटपाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत तात्या पाटील, ज्येष्ठ नेेेेते रावसाहेब पाटील, अण्णासाहेब पत्की, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, महिला तालुकाध्यक्ष सौ. अश्विनी कासार, युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, दत्तात्रय यमगर, शशिकांत शिंदे, जालिंदर कटरे, विष्णुपंत चव्हाण, राजू जानकर, प्रदेश प्रतिनिधी सादिक खाटीक, मनोहर विभुते, महिला जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील, उपवनसंरक्षक विजय माने, बांबूचे व्यापारी अजित भोसले, बांबूू प्रक्रिया उद्योजक कैलास नागे, गणेेश शिंदे, बांबू उत्पादक शेतकरी अरविंद कल्याणकर, बाबुराव गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
माणगंगा उद्योग समूहाचे संस्थापक आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले,आटपाडी तालुका हा डाळिंब उत्पादन करणारा तालुका आहे.आता डाळींबाकडून बांबूकडे जास्त पैसा मिळत असेल तर त्याकडे वळले तरी चालेल.बांबू हा कायम पैसा देणारा आहे,म्हणून महत्त्वाचा आहे. बांबूला चांगली बाजारपेठ आता निर्माण झालेली आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी दोन-अडीच एकरापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड करण्यास हरकत नाही. त्यात यश मिळाले की उरलेल्या शेतकऱ्यांना त्याचे मार्गदर्शन होईल. बांबूवरील सबसिडीसाठी प्रयत्न करू.शेतकऱ्यांना फायदा असेल व सरकारला तोटा होत नसेल तर निश्चितपणे सबसिडी वाढवण्यासाठी प्रयत्न करू. बांबू हे पर्यायी चांगले पीक सर्वांना उपलब्ध झालेले आहे. जिल्ह्यात बांबू लागवड वाढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका व्यक्त केली आहे. बांबू लागवड वाढण्यासाठी शासकीय विभागाकडून प्रयत्न व सर्व विभागाकडून सहकार्य मिळेल. बांबू हे एकविसाव्या शतकातील हिरवे सोने आहे. बांबूू अनेक उद्योगाला लागणारा कच्चा माल आहे, त्यामुळे बांबू लागवड करावी. बांबू लागवड वाढल्यास छोटे छोटे काम करणारे उद्योगांना यांना संधी मिळणार आहे. शेतीसाठी पुरक असा हा नवा प्रयोग करायला तालुक्यात हरकत नाही. पाणी नसताना एवढे सुंदर डाळिंबाचे पीक घेत होता, आता तर पाणी आले आहे. चांगले कष्ट करून चांगले पीक काढा.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यात नवनवीन प्रयोग करून यशस्वी केले जातात. आटपाडी तालुक्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.सांगोला, आटपाडी परिसर निर्यातक्षम डाळिंबामध्ये संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे. बांबू लागवडीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. बांबू लागवडीतून आटपाडी तालुक्यात भविष्यात कृषी क्रांती होईल. तालुक्याचे अर्थकारण अधिक वेगाने वाढेल.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, आजची कार्यशाळा झाल्यानंतर बांबू लागवड फायदेशीर आहे हे लक्षात येईल. शेती उत्पादनामध्ये हा एक विकल्प आहे. जिल्हामध्ये बांबू लागवड आपण करू शकतो. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सर्व विभाग करते. गटागटाने शेतकर्‍याने त्यांच्या माध्यमातून लागवडीपुरते मर्यादित ठेवणार नाही, तर प्रोसेसिंग युनिट, मशिनरी यासाठी मदत शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून, योजनेतून देवू.
शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नासाठी बांबू लागवडीचा विचार करावा, अधिक माहिती घ्यावी.
यावेळी बोलताना सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विलास काळे म्हणाले, बांबूूू लागवड यशस्वी करण्याचे आहे.बांबू हे एविसाव्या शतकातील सोने आहे. जलद गतीने वाढणारे पीक आहे. देशात २६ हजार कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. बांबू लागवडीविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीला स्कोप आहे. द्राक्ष, डाळिंब या पिकांचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत समावेश झाला आहेे.
प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी राष्ट्रीय बांबू मिशन विषयी माहिती सांगितली. जॉली बोर्डाचे व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी कंपनीच्या फायद्यामध्ये कच्चामाल म्हणून बांबूचे महत्व व अर्थकारण सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी सादिक खाटीक यांनी आभार मानले.