यशवंत क्रांती संघटनेच्या प्रयन्नाला यश

सुभाष तांदळे यांना वनविभागाकडून ८१हजार रुपये नुकसान भरपाई
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
शिराळा

रेड ता.शिराळा येथील सुभाष तुकाराम तांदळे यांचा दीडशे मेंढरांचा कळप आहे. त्यांनी कापरे येथील जयसिंग केशव पाटील यांच्या तलावाचा माळ जवळ असणाऱ्या शेतात खतासाठी मेंढरं (तळ )बसवली असताना दि.८/९/२०२१ रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सुभाष घरी जेवण आण्यासाठी गेले होते. दरम्यानच्या काळात बिबट्याने कळपावर हल्ला केला व बकऱ्यांना ठार केले होते. या घटनेची माहिती मेंढपाळ यांनी यशव़ंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती वनविभाग व पशुसंवर्धन विभाग यांना कळवून रितसर पंंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सुभाष तुकाराम तांदळे यांना वनविभाग याचेकडून ८१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. याबद्दल शरद सुभाष तांदळे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे,नानासो घोडके शाखा अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना एतवडे बु। तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, वनविभाग पशुसंवर्धन विभाग यांचे आभार मानले.
यावेळी यशवंत क्रांती संघटना ऐतवडे बु शाखा अध्यक्ष नाना घोडके, खजिनदार प्रताप वाघमोडे, उपाध्यक्ष आनंदा वाघमोडे, सचिव सागर पसाले, सुनिल नांगरे, सागर वाघमोडे, चंद्रकांत पसाले, शरद तांदळे, सुभाष तांदळे व मेंढपाळ उपस्थित होते. नुकसान भरपाई मिळाल्याने संघटनेचे आभार व समाधान मेंढपाळ व्यक्त केले. यावेळी यशव़ंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.