प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष ॲड.संजय माने यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. पक्षाने आतापर्यंत जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. यापुढे देखील पक्ष जो जबाबदारी देईल, ती पार पाडून पक्ष वाढीला चालना देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही माने यांनी यावेळी दिली.
माने यांनी महादेव जानकर यांच्यासोबत गेली अनेक वर्षे पक्षात निष्ठेने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक पदांवर काम केलेले आहे.
यावेळी विद्यार्थी आघाडीचे पंकज देवकाते ,माढा लोकसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष म्हाळाप्पा खांडेकर, तालुका अध्यक्ष संजय लवटे, तालुका सरचिटणीस प्रवीण तरंगे, संतोष मेटकरी, मुकुंद घाडगे व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद