अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जागतिक सर्जनशीलता आणि नवोपक्रम दिना’निमित्त आझादी का अमृत महोत्सवातंर्गत राजे रामराव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत ‘रांगोळीतून आकृतीचे प्रदर्शन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
अर्थशास्त्र विषयातील सिध्दांत अनेक आकृतींच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले.ते मुलांना लक्ष्यात रहावे म्हणून आपल्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या सिध्दांतातील आकृतीचे रांगोळ्याच्या साहाय्याने प्रदर्शन करून वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयातील बी.ए. व बी. कॉम. वर्गातील एकूण ९१ विद्यार्थी-विद्यार्थीनीने सहभाग नोंदवून विविध आकृतीचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश एस. पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना विकसित झाल्या पाहिजेत आणि विद्यार्थी हे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून शकतात. समाज व देशाच्या विकासासाठी विद्यार्थी हा विकसित झाला पाहिजे. त्यांच्यात संशोधन वृत्ती विकसित केले पाहिजे आणि यासाठी महाविद्यालयामार्फत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करण्याचे प्रयत्न केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन प्रा.बोगुलवर अशोक तर आभार विभागप्रमुख डॉ. शंकर गावडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. रणदिवे डी. बी.,डॉ.शिवाजी कुलाळ, डॉ. भीमाशंकर डहाळके, प्रा.हिरामण टोंगारे, प्रा.नवले ए. बी., प्रा.रामदास बनसोडे, प्रा.पुंडलिक चौधरी व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद