संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.हे राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे सामाजिक काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अँड.संजय माने – पाटील यांनी केले.
मोटेवाडीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन अँड. संजय माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळशिरस तालुका प्रभारी शंकर शेंडगे, माळशिरस विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष नारायण देवकाते,नाना देवकाते,संजय शेंडगे,रमेश हांडे,आप्पा शेंडगे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद