
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे पर्यावरण विकास संस्था व राष्ट्रीय पोलिस मित्र माळशिरस तालुका व सोलापूर जिल्हा टीमने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडीतील शाळेस भेट देवून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक विकास घडविण्यायोग्य मुला-मुलींना दिली. शाळेच्या आवारात वृक्षारोपन करु असाही सल्ला दिला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी पर्यावरण विकास संस्थेला प्रतिसाद दिला.
पर्यावरण विकास संस्थेमार्फत होणारे सर्व उपक्रम व संपुर्ण सामाजक विषयावर शाळेतील मुलांना सखोल असी माहिती
१) कुऱ्हाड बंदी २)जल संवर्धन ३)शिकार बंदी ४)प्लास्टिक बंदी यांसारख्या विषयावर पर्यावरण विकास संस्था या टीम मार्फत सर्व अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा व्यवस्थापक उदय केमकर यांनी केलेे.आभार माळशिरस तालुका व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद