
कुंभोज येथील घटना,परिसरात हळहळ
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/हातकणंगले:
मेंढपाळ संदिप विठ्ठल भानुसे,विठ्ठल लक्ष्मण घोदे,बिरू खानाप्पा पुजारी (रा.कुंभोज ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) या सर्व मेंढपाळांच्या (३००) मेंढरांचा तळ खतासाठी आठ दिवसापासून सुभाष दादा अकिवाटे यांच्या कुंभोज दुधगाव रोडवर ( वारणा नदी जवळ उरूणात) असणाऱ्या शेतात (गट नंबर २९५१) बसायला आहेत. सोमवार दि.११/४/२०२२ रोजी संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास तरसांनी हल्ला करून तारेच्या जाळीत ठेवलेल्या संदिप भानुसे यांच्या ११ बकऱ्यांना ठार मारले व चार बकऱ्यांना गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात मेंढपाळ संदिप विठ्ठल भानुसे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मेंढपाळ संदिप भानुसे,व अमोल गावडे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना ही घटना फोनवरून तात्काळ कळवली. संजय वाघमोडे यांनी वनाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह घटनास्थळी हजर राहून घटनेचा पंचनामे करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली.
वनरक्षक मोहन देसाई, वनसेवक प्रमोद गुरव यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारीअधिकारी डॉ. चिकबिरे व डॉ. उदय देसाई यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांच्या हल्याच्या घटना वारंवार घडत आहे. मिरजवाडी, आष्टा व तुंग,दानोळी, कुंभोज याठिकाणी एकामागून एक अशा घडल्याने मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई अत्यंत कमी मिळते. तसेच विमा कंपन्या व सरकार शेळ्या मेंढ्याना विमासंरक्षण देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.चालू बाजार भावानुसार मटनाचा दर सहाशे ते सातशे रुपये किलो आहे.यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने केली.
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिरोळचे तालुकाध्यक्ष दादासो गावडे, प.महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे,जिल्हा संघटक श्रावण गावडे,हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, संघटनेचे युवा नेते सचिन नांगरे,महिला तालुका अध्यक्ष तेजस्विनी भानुसे,अमोल गावडे, सचिन पुजारी, प्रविण भानुसे, पोलिस पाटील महम्मद पठाण, अनिल पाटील, सुभाष आकिवाटे यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या