अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
अचकनहळ्ळी ते वायफळ या रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल भाऊसाहेब शिंदे (वय. १२ रा. अचकनहळ्ळी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक तानाजी धोंडीराम कोडग रा. आवंढी ता. जत याच्यावर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, जत अचकनहळ्ळी-वायफळ या रस्त्यावर शिंदे यांचे घर आहे. दुपारी राहुल शिंदे हा आपले मित्र अथर्व सोलनकर यांच्यासोबत सायकलवरून रस्त्यावरून जात होता. दरम्यान समोरून तानाजी कोडग यांचा टेम्पो भरधाव वेगाने येत होता. यावेळी राहुलच्या सायकलीला टेम्पोने जोरदार धडक दिली. यात राहुल जागीच ठार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लवटे करत आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या