नागासोबत स्टंटबाजी, किस…? अन् तरुणावर कारवाई !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
नाग हा विषारी सर्पवर्ग असताना अशा नागासोबत जोखमीचे व्हिडिओ तयार करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या वाळवा तालुक्यातील बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे या २२ वर्षीय तरुणाला वन विभागाने सोमवार दि. २८ मार्च रोजी ताब्यात घेतले आहे. वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागाला पकडून त्याच्यासोबत अनेक व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल करत होता.
प्रदीप आडसुळे हा नागासोबत स्टंट करत होता. त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत होता. त्या व्हिडिओंना लाइक्स व कमेंट्सही चांगल्या मिळत होत्या. त्यामुळे तो सोशल मीडियावर आणखी व्हिडिओ पोस्ट करत होता. ही बाब सांगली वनविभागाच्या निदर्शनास आली.


त्यानुसार वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार शिराळाचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले, बावचीचे वनरक्षक अमोल साठे, निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने सांगली येथील वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.