माळशिरस तालुका प्रतिनिधी/ संजय हुलगे :

कृषी संजीवनी सप्ताह २०२०-२१ अंतर्गत, तुकाराम मारुती वाघमोडे(माळशिरस)यांचे शेतात गाव बैठक घेण्यात आली.या बैठकीत जमिनीची सुपीकता,कस,व उत्पादकता वाढविणेसाठी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती कृषी सहाय्यक स्वप्ना गोफणे यांनी दिली .
कृषी संजीवनी सप्ताह २०२०-२१ अंतर्गत, माळशिरस येथे बैठक घेण्यात आली . यावेळी स्वप्ना गोफणे मॅडम कृषी सहायक माळशिरस, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे,तो समृध्द व्हावा यासाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे .यामध्ये पिकांची उत्पादकता,गुणवत्ता व उत्पन्न वाढ या त्री सुत्रीचा अवलंब कृषी विभाग करणार आहे.मंडळ कृषी अधिकारी एस .एस टकले साहेब यांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले,वखार महमंडळाच्या साठा अधीक्षक सायली कांबळे मॅडम वखार महामंडळाच्या सर्व योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डी वाय पाटील कृषी महाविद्यालय कोल्हापूर चे प्राध्यापक शिर कासलींग गोरड यांनी जमिनीची सुपीकता,कस,व उत्पादकता वाढविणे साठी करावयाची उपाय योजना विषयी मार्गदर्शन केले,कृषी सहायक श्री लोखंडे साहेब यांनी सेंद्रिय शेती व मक्यावरील लष्करी अळी उपाययोजांबाबत माहिती दिली, कृषि सहायक गोफणे मॅडम उसवरील हुमनी कीड नियंत्रण वर माहिती दिली,या वेळी घनश्याम वाघमोडे कृषी सहाय्यक ,व माळशिरस गावातील शेतकरी बंधू उपस्थित होते, कृषी सहायक प्रदीप माने यांनी उपस्थितांचे आभार मानले .

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा