सन्मान होतकरू,कष्टकरी महिलांचा व कत्तृत्वान भगिनींचा,
उपक्रम आटपाडी शिक्षक समिती महिला आघाडीचा!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी :
जागतिक महिला दिनानिमित्त आटपाडी प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी यांच्या वतीने कष्टकरी महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या कर्तृत्ववान महिलांचाही सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आटपाडी तालुका पंचायत समिती सभापती सौ. पुष्पाताई सरगर, आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वृषालीताई पाटील, सेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापिका सौ.सुजाता देशमुख, कृषी विद्यालय प्राचार्या ज्योती गुरव आणि महिला मानवी अधिकार तालुकाध्यक्ष सौ. संगीता पिंजारी यांना कर्तुत्ववान महिला म्हणून गौरवण्यात आले. तसेच कष्टकरी महिला म्हणून श्रीमती वंदना भिसे, सौ. द्रौपदी खरात, श्रीमती उषा चंदनशिवे ,सौ.ललिता मोटे आदि कष्टकरी महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला अध्यक्षा सौ. संगीता कुंभार , माजी अध्यक्षा सौ. वैशाली राक्षे , माजी सरचिटणीस सौ. तेजस्विनी गायकवाड , सौ. योगिता शिंदे ,सौ. कविता डोंबाळे , सौ. अनिता जाधव , सौ. ललिता पावणे ,सौ.शितल चंदनशिवे , सौ.अर्चना कबीर , श्रीम .लतिका बोराडे , सौ. उषा माळी , सौ. रेश्माबी आत्तार,सौ.सूर्यवंशी , सौ. मनीषा चव्हाण , सौ. मेघा महामुनी , सौ. विजया राक्षे , सौ. गायकवाड , सौ.रेखा गाडेकर ,सौ. वर्षा पाटील व सौ. अनिता पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक सौ.वैशाली राक्षे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तेजस्विनी गायकवाड यांनी केले.
सौ.कविता डोंबाळे, सौ.अनिता जाधव, सौ.रेश्माबी आतार यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना शिक्षक समिती ही नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेली संघटना आहे.या कार्यक्रमाचे आभार सौ. ललिता पावणे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद