
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस येथील प्रसिद्ध स्मुर्ती हार्डवेअरचे मालक गोविंद गायकवाड यांचे सुपुत्र व गजराज हार्डवेअरचे मालक सागर गायकवाड(वय ३२) याचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले.निधनाची वार्ता सोशल मीडियावरुन वा-यासारखी पसरली. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यात शोककळा पसरली.
सागर व मित्र परिवाराने ड्रीम फाउंडेशनची नुकतीच स्थापना केली होती.सागरकडे या संस्थेची सचिव पदाची जबाबदारी होतो. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले होते.यात मुख्यत्वे वृक्षारोपण,गरीब गरजूंना मदत,अशा छोट्या-मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास सुरवात केली होती.या माध्यमातून सागरशी अनेक मित्र परिवार जोडला गेला होता.तसेच माळशिरस येथे गजराज हार्डवेअर हा व्यवसाय सुरु केला होता.यामाध्यातूनही अनेकांशी मैत्रीची नाळ जोडली होती.अडचणीच्या काळात प्रत्येकाला मदतीचा हात देणे, यासाठी सागर नेहमी अग्रेसर असायाचा. श्री श्री रवी शंकरजी यांच्या विचारांचा पगडा घेऊन यामध्ये आध्यत्म व विज्ञान याच्याशी सलग्न असणारे रविशंकरजी यांचे योग कार्य याचा प्रचार व प्रसार करणे हे कार्य सागरने सुरु केले होते. हे सर्व काही सुरु असताना अचानक एका आजाराशी झुंज सुरु झाली आणि दोन महिन्यामध्ये सागरची प्राणज्योत मालवली….आणि उराशी बाळगलेलं ड्रीम सागरने अर्ध्यावर सोडलं.
सागरच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहीण,पत्नी असा परिवार आहे. माळशिरस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्ययात्रेत नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान अनेकांचे आश्रू यावेळी अनावर झाले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद