सृष्टी सुर्यवंशी,मधुरा मदने,श्रुती तांबे यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत शिवसेनेच्यावतीने हिंदहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी सुनील सूर्यवंशी हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकविला. मोठ्या गटात येळवी येथील मधुरा मारुती मदने, घोलेश्वर येथील श्रुती उर्फ मयुरी बाळासाहेब तांबे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजीवकुमार सावंत यांनी या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी गुरव, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अमित दुधाळ, अंकुश हुवाळे , सचिन मदने, तेजस्वनी व्हनमाने आदी उपस्थित होते.
जत पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात राज्याचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते सृष्टी सुर्यवंशी,मधुरा मदने,श्रुती तांबे आदी विजेत्यांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख अँड. मिलिंद कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी गुरव,तालुका शिवसेना प्रमुख संजीवकुमार सावंत, युवा सेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ आदी उपस्थित होते.