अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत :
जत येथील विठ्ठल नगर येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस किरण शिंदे, जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, जत नगरपरिषदेच्या नगरसेविका वनिता साळे,तानाजी व्हनखंडे,कुमार (आण्णा)साळे, पांडुरंग(शेठ)बामणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी बांधकाम सभापती तथा जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देऊन संत रोहिदास महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोचविणे म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखे आहे, असे स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाला किसन व्हनखंडे, अरुण साळे, दत्ता शिंदे,मारुती साळे,पांडुरंग सूर्यवंशी, पप्पू कांबळे, गणेश साळे, नाना व्हनमोरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद