निंबवडेत महिलांच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे सभापती सौ.सरगर यांच्या हस्ते उद्घाटन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
निंबवडे ग्रामपंचायतच्या वतीने निंबवडे पंचक्रोशीतील महिलांना शेळीपालन,कापडी पिशव्या तयार करणे,केक तयार करणे या प्रशिक्षणाचे उद्घाटन आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंत (भाऊ) सरगर यांच्या हस्ते व सरपंच नंदाताई देटे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सभापती सौ.पुष्पाताई जयवंत (भाऊ) सरगर व ग्रामसेवक संजय करने यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी निंबवडे पंचक्रोशीतील महिला उपस्थित होत्या.