अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत :
दोन्ही लस घेतलेल्या जतमधील नागरिकांना जागर फौंडेशनच्यावतीने मोफत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
जागर फौंडेशन हे कायम समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. कोरोनाच्या काळात जागर फौंडेशनने केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे. कोरोना काळात लसीकरण जनजागृती बरोबरच लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या लाभाथ्यांना मोफत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. परशुराम मोरे यांनी त्यांच्या विठ्ठलनगर येथील कार्यालयात हा उपक्रम हाती घेतला आहे. विठ्ठलनगरसह शहरातील अनेकजण दोन डोस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यावेळी युवक नेते कुमार (आण्णा) साळे,सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर जाधव, विकास बनपट्टे,पांडूरग सूर्यवंशी,पवन मोरे, आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद