रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदुरबाजार:
चांदुर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथे किरकोळ कारणावरून रागाच्याभरात सासूच्या घरी कुर्हाडीने सपासप वार करुन सासूला जागीच ठार केल्याची घटना २८ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.पत्नी मध्ये आली असता तिलाही गंभीर जखमी केले.
काही दिवसाआगोदर पत्नी स्नेहल ही आपल्या आईकडे पाहूणपणासाठी आली असता तिथे सोबत तिचा पती आरोपी दिनेश भानुदास भोरखडे (३०,रा. पेठ इतबारपूर ता. दर्यापूर) हा सुद्धा सासूच्या घरी होता. काही शुल्लक कारणावरून घरगुती वाद झाला आणि त्या वादाच्या भरात आरोपीने सासू पद्मा उर्फ रुख्मा (४५) हिच्यावर कुर्हाडीने सपासप वार केले. अशा परिस्थितीत आपल्या आईवर होत असलेल्या हल्ल्यामुळे मृतक पद्मा उर्फ रूख्माची मुलगी मध्यस्ती करण्याचा केली असता आरोपी दिनेश भानुदास भोरखडे याने आपली पत्नी स्नेहल दिनेश भोरखडे हिला कुर्हाडीने जबर मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली.शेजारी या घटनेची आरडाओरड झाल्याने आरोपी दिनेश भानुदास भोरखडे हा पळ काढून फरार होण्यात यशस्वी झाला.
या घटनेची तक्रार स्नेहल दिनेश भोरखडे हिने आसेगाव पोलीस स्टेशनला दिली. तर संतप्त जमावाने आरोपीला अटक करण्याची मागणी केली.परंतु आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांच्या आश्वासनाने प्रकरण शांत झाले. मृतकाचे शव उर्वरित तपासणीसाठी अचलपूर येथे पाठविण्यात आले. अद्यापपर्यंत आरोपीस अटक झाली नव्हती. या घटनेची चौकशी ठाणेदार किशोर तावडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या