बस व ट्रकची समोरासमोर धडक; ६ ठार, ८जखमी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /बीड:
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हा अपघात लातूर-अंबाजोगाई मार्गावर झाला आहे.सकाळी धुके पडल्याने सायगाव नजीक नंदगोपाल डेअरीजवळ असलेल्या खडी केंद्राजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याचे बोलले जात आहे. अपघाताच्या भीषणतेमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील या अपघातामुळे रस्त्याची कोंडी झाल्याने भोकरंभा रस्त्याने लातूरला जाणारी वाहतूक सुरू करण्यात आले आहे. अपघातामधील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात,असे सांगण्यात येते.