अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत येथील वळसंग रोडलगत जत हद्दीतील असलेल्या
लोकेशन पाॅईंट MVT 90 या पवनचक्कीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळुन नुकसान केले आहे.याबाबतची फिर्याद अरुण अनंत शिंदे यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जत वळसंग रोडपासून चार किलोमीटर असलेल्या आयनॉक्स विंड पवनचक्कीचे अज्ञात चोरट्याने कडून दि.22-12-2021 रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याकडून सुमारे दोन कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे.
अरुण शिंदे राहणार छ.शिवाजी पेठ जत हे मागील पाच वर्षापासून मागील 5 वर्षापासुन आयनॉक्स विंड पवनचक्कीमध्ये मॅट्रिक्स कंपनीमध्ये सुपरवाझर म्हणून नोकरीस आहे.
त्यांनी घटनेबाबत माहिती दिली की, दि.22 रोजी सकाळी आठ वाजता मला चालक योगेश चव्हाण यांचा फोन आला की, जत हद्दीत वळसंग रोड या लोकेशन पाईट MVT 90 या पवनचक्कीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तिने जाळुन नुकसान केले आहे. तरी तुम्ही लवकर या असा फोन आल्याने मी लागलीच घटनास्थळी गेलो. तेथे जावुन पवनचक्कीचे मुख्य दरवाजाजवळ आलो असता आम्हाला आगीमध्ये पवनचक्की कंपनीचे 1,99,31,768/- किमतीचे ऑपरेटींग पॅनल, कन्वटर, कैंपर रिंग, कॅपर केबल, अॅल्युमिनीयम केबल, 185 ची सी. यु. केबल, सी. सी. यु किट, सेप्टी चैन केबल, सी. यु. बॉरेल लग्ज, HT yard ABC व मेन ट्रोन्सफॉर्म इत्यादी साहित्य, कोणीतरी अज्ञात इसमाने धान्याचे रिकामे पोते टाकुन पेटवुन नुकसान केले आहे. त्यानंतर मी आमचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गौरव दुभे यांना फोन वरुन माहीती दिली त्यानंतर इंजिनीयर रविंद्र नेहते हे त्याठिकाणी आले व त्यांनी पाहणी करून केले. त्यानंतर मी आमेचे वरीष्ठांशी चर्चा करून जत पोलिसात तक्रार देण्यात आली .
अशा घटना या भागातील अनेक पवनचक्कीमध्ये वारंवार घडत असून याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,असे मत पवनचक्कीमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या