सर्कल ‘गब्बरसिंग…’ ला ‘लाचलुचपतचा फास’!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
तासगाव /माळशिरस:

तासगाव येथील मंडल अधिकारी-लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे (वय ३७ वर्ष,मंडल अधिकारी कार्यालय, तासगांव रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली) याच्यावर लाच स्विकारलेनंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या गावातील सोसायटीमध्ये जमिनीवर कर्ज मिळणेबाबत अर्ज केला आहे. या कर्जासाठी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ई कराराची नोंद होणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी ई करार नोंद होणेबाबत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर ई करार न होण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय, तासगांव या ठिकाणी तक्रार प्राप्त झाली होती.
संबंधित तक्रारीची सुनावणी मंडल अधिकारी गारळे याचे समक्ष सुरू होती. याचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी गारळे याने तक्रारदार यांचेकडे दहा हजार रूपयांची लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.०६.१२.२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दि.०७.१२.२०२१ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे तातडीने पडताळणी केली. त्यामध्ये लोकसेवक गारळे याने तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे प्रथम १०,०००/- रूपये लोचेची मागणी करून चर्चेअंती ८०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर कॉलेज चौक, तासगांव या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे याने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून ८०००/- रूपये स्विकारलेनंतर त्याला पकडण्यात आले आहे.
त्याच्याविरुध्द तासगांव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
ही कारवाई पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व सुहास नाडगौडा याांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे व प्रशांत चौगुले, पोलीस अंमलदार सलिम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, सिमा माने, प्रितम चौगुले यांनी केली आहे.
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्सअप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
१) मोबाईल अॅप www.acbmaharashtra.net
२) फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB (3) वेबसाईट :- www.acbmaharashtra.gov.in