मनसे स्टाईलने,लोकवर्गणीतून रामपूर रस्‍त्‍याची डागडुजी युवा नेते शरद चव्हाण यांचा पुढाकार

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

रामपूर फाटा ते रामपूर गावाला जोडणारा रस्‍त्‍यांवर खड्डेच दिसतात.यामुळे वाहनधारकदेखील त्रस्‍त झाले आहेत. रस्‍त्‍यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे रामपूरचे युवा नेते शरद चव्हाण यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून खड्डे बुजवायला सुरुवात केली.
या रस्त्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून अक्षरशः दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर पडलेले खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.तसेच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
रामपूर रस्त्याच्या मागणीसाठी शरद चव्हाण यांनी जत पंचायत समितीसमोर गेल्या आठवड्यात उपोषणाला बसले होते.यावेळी आमदारांचे कट्टर समर्थक मारुती पवार यांनी दोन दिवसात स्वखर्चातून रस्ता पूर्ण करून देतो, म्हणून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.आजअखेर मारुती पवार यांनी गावाकडे फिरकले नसल्याने शरद चव्हाण यांनी पुढाकार घेत लोक वर्गणीतून रस्ता दुरुस्ती करून घेतले.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी खोटे आश्वासन देवून उपोषण मागे घेण्यास भाग पाडलेले. पण मारुती पवार यांना रस्त्याची डागडुजी करून मनसे स्टाइलने उत्तर दिले.यावेळी युवा नेते निशांत घाडगे,शरद शिवशरण, गोविंद मोरे,रमाकांत कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.