संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
महिलांनी सक्षम व्हावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मोलाची भूमिका बजावत आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले .
माळशिरस येथील पंचायत समिती सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिला बचत गटांना बँक कर्जाचे वाटप करण्यात आले. महिलांनी सक्षम व्हावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गटांना नेहमी चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मोलाची भूमिका बजावत आहे असे शितलदेवी यावेळी म्हणाल्या.
यावेळी जि.प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिला बचत गटांना बॅंक कर्जाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील , उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पं.स.सदस्या हेमलता चांडोले, जि.प.सदस्या सुनंदा फुले, उमेश जाधव, शुभांगी पवार, गौरी गावडे आदीसह महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या .

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद