जतमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळासंगे कमळाई रममान!

नगरपरिषद प्रभाग क्र.५ च्या पोटनिवडणुकीस राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचारास शुभारंभ
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तत्कालीन नगरसेवक स्वर्गीय इकबाल (पट्टू) गवंडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसने जत येथील चिंनगीबाबाचे दर्शन घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. इकबाल गवंडी यांचे सुपुत्र इमरान गवंडी यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या ताकदीने ते या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे म्हणाले की, स्वर्गीय इकबाल (पट्टू) गवंडी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर इमरान गवंडी यांचा विजय निश्‍चित आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, भाजपचे नगरसेवक प्रकाश माने, प्रमोद हिरवे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, अण्णा भिसे, सद्दाम अत्तार, सलीम भाई गवंडी,मकसूद नगारजी, संतोष मोटे,अभिजित कणसे,बसवराज चव्हाण, सलीम मणेर, प्रकाश मोटे, बाळ सावंत, डॉ. हैद्राबादे, हाजीसाब हुजरे, आर्षद गंवडी, जनार्दन साळे, बसवराज अलगुर,कांबळे गुरुजी, अशोक साळे, अनिल आरळी, भानुदास व्हनखंडे,पप्पू मोगली यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.