नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माडगुळे :
महाकवी, आधुनिक वाल्मिकी, कथा, पटकथाकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ग.दि.माडगूळकर (अण्णा) यांचा ४४वा स्मृती समारोह माडगुळे येथे ग.दि.माडगूळकर हायस्कूल व पद्मभूषण वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेज, माडगुळे, कामगार कल्याण केंद्र, माडगुळे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने माडगुळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंगळवार दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० ते ९:३० वेळेत गदिमा प्रतिमेची माडगुळे गावातून प्रभातफेरी,
सकाळी ९:३० वाजता साहित्य दरबार कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रा.टी.ए.चव्हाण, प्रमुख वक्ते जयवंत आवटे (ग्रामीण कथाकार) तर कार्यक्रमास संभाजी पवार (कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय सांगली) प्रा. तानाजी वाघमारे( ग्रामीण साहित्यिक),सुधीर इनामदार( गझलकार), ज्ञानेश डोंगरे (मानदेशी कवी )यांचा सहभाग आहे.
करमणुकीचा कार्यक्रम म्हणून मंगळवारी
रात्री ८:३० वाजता महाकवी ग.दि .माडगूळकर यांच्या स्मृतीला उजाळा देणेकरता त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या बहारदार निवडक गीताचा कार्यक्रम– रसिक मित्र प्रस्तुत ‘घ्यावा गाण्यांचा मुजरा’ नृत्याविष्कर, निर्माता व संयोजक प्रा.सुरेश गायकवाड,सादरकर्ते ग दि माडगूळकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज माडगुळे व भारत कलावंत निर्माण फाउंडेशन आटपाडीचे कलावंत आहेत.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु