
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत तालुक्यातील प्रतापुर येथे घर जळाल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्यासह श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी प्रतापूर येथे भेट देत त्या कुटूंबियांना मदतीचा हात दिला.
प्रतापुर येथील सावित्री बाबासो हेगडे यांच्या झोपडीवजा घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते. हेगडे कुटूंबीय रस्त्यावर आले होते. या घटनेची माहिती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी तुकाराम बाबा महाराज यांना सांगितली. तुकाराम बाबांनी प्रतापूर येथे येऊन हेगडे कुटूंबियांची भेट घेतली. हेगडे कुटूंबियांना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला.
यावेळी ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले, सलमा शेख,लवीना हेगडे,विठ्ठल हेगडे,सागर मोरे, रेवन वाघमोडे, कुमार इंगवले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, मानव मित्र संघटना ही मदतीसाठी सदैव सज्ज असते. एखादी दुर्घटना घडल्यास जतकरांनीही मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद