अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
निगडी खुर्द येथील रॉयल मराठा पब्लिक स्कूल येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.एस. एम.शेख उपस्थित होते. एस.पी.गुरव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. एम. एम. शेख यांनी संविधान दिनाचे व संविधानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच संविधानानुसार नियम कसे पाळावेत व आपल्या जबाबदारी व कर्तव्याचे पालन कसे करावे यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन सावंत व सौरभ शेंडगे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार झांबरे सरांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद