संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत केंद्र शासनाअंतर्गत श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. याद्वारे लाभार्थ्यांना आरोग्य सुरक्षा विमा, आपत्कालीन सुरक्षा विमा, पेंन्शन योजना अशा अनेक सामाजिक सुरक्षा योजनांचे थेट लाभ मिळणार आहेत. ही ई-श्रम योजना आपल्या भागात राबविणारा हा पहिलाच कारखाना आहे, ज्याने ड्रायव्हर, कामगार व इतर नागरिकांसाठी ही केंद्रशासनाची योजना राबविली आहे.
आज श्री शंकर सहकारी कारखाना येथे ट्रॅक्टर ड्रायव्हर यांचे ई-श्रम योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास सुरुवात झाली. श्री. शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आ.रणजितसिंह मोहिते पाटील व व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी व सर्व संचालक यांनी हा निर्णय घेतला.
जे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऊस वाहतूक करतात,त्यांचा ई-श्रम नोंदणी मार्फत केंद्र शासनाच्या भविष्यात राबविणात येणाऱ्या कोणत्याही योजना असतील तर त्या थेट नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच आज कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जवळपास २४० कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे, असे कार्यकारी संचालक रवींद्र जगताप यांनी सांगितले.
गेली ४ ते ५ वर्षे कारखाना बंद होता, तेंव्हा या कामगारांची, कर्मचाऱ्यांची व संबंधित लोकांची बिकट अवस्था होती. परंतु आज कारखाना चालू होत असतानाच या सर्वांचे चेअरमन आ.रणजितसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांनी ही अवस्था पाहून कामगारांच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आपल्याच कारखान्याच्या कार्यस्थळावर ही योजना राबविली जेणेकरून याचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद