करगणी येथील दफनभूमीचा प्रलंबित प्रश्न निकाली!

युवा नेते उमेश पाटील यांची माहिती
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/करगणी:
करगणी येथील गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला दफनभूमीचा प्रश्न राष्टवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष (व्यसनमुक्ती) उमेश पाटील यांनी एन.पी.खरजे यांना साथीस घेत पालकमंत्री जयंतराव पाटील व वैभवदादा पाटील यांच्यामार्फत निकाली काढला.
दि.३ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी विटा यांनी आदेश देताच करगणी गावातील शेकडो मुस्लिम बांधवांनी जल्लोष केला व युवा नेते उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस टीमला धन्यवाद दिले.
मुस्लिम समाजाचे नेते बरकत शेख, नवाज जमादार, शाहरुख पठाण,हबीब पठाण, मुद्दसर इनामदार, मोहम्मद पठाण, लियाकत मुल्ला, समीर मुल्ला, हजरत जमादार, हुसेन इनामदार, खालिद जमादार, भैया पठाण, जमीर मुल्ला यांचेसह मुस्लिम बांधवांनी हा आदेश प्रांताधिकारी यांचेकडून स्वीकारला.