मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
शिवयोगी भीमाशंकर उर्फ कैलासवासी सखाराम बाळकृष्ण गुरव (गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्ट,आटपाडी संचलित पद्मश्री मंगल मुक्तद्वार ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून या मुक्तद्वार ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले.
सौ.मंगल गुरव व वसंत गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.पी.एस.गुरव यांनी ग्रंथालय सेवेची रुपरेषा सांगून ग्रंथालय उभारणीमागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी श्री सिद्धेश्वर कंप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक प्राचार्य बी.बी.गुरव,प्रा.प्रवीण भांबुरे, निर्मलकुमार जुगदर, शीतल मोरे, प्रशांत कदम, दगडू काळे,आदित्य जुगदर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मंगलोर या जन्मभूमी व कर्मभूमीचे नाव उज्ज्वल करणारे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हरेकला हजब्बा यांच्या प्रेरणेतून व आईस्वरुप मोठी बहीण सौ.मंगल यांच्या प्रेरणेने, साहित्यिक रत्नांची खाण असलेल्या आपल्या माणदेशातील मातृभूमीचे उतराई होण्याच्या इच्छेने पद्मश्री मंगल या ग्रंथालयाच्या लोकार्पणाची प्रेरणा घेतल्याचे पी. एस.गुरव यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीला वैयक्तिक मालकीची जवळपास दीड हजार पुस्तके गुरव यांनी सार्वजनिक केली आहेत. या सेवाकार्यासाठी सौ.विद्याराणी गुरव, विठ्ठल गुरव तसेच सौ.उमा गुरव यांचे योगदान लाभले आहे. वाचनप्रेमींनी या मुक्तद्वार ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरव कुटुंबीय,आटपाडी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद