
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत शहरांमध्ये युवा समाजसेवक संतोष (भैय्या)साबळे लोकांना मदत करण्यासाठी कायम अग्रेसर असतात. ते सामाजिक कामात अग्रेसर असतात.लोकांना शहरांमध्ये बसण्यासाठी बाकडांची व्यवस्था केली.
गेल्या तीन-चार दिवसांंपासून ट्रांसफाँँर्मर जळल्यामुळे जत शहराला पाणीपुरवठा खंडित झाला आहे.ही बाब युवक नेते संतोष साबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून पिण्याच्या पाण्या टँकरची व्यवस्था केली.चार-पाच दिवसांंपासून हा वीजपुरवठा खंडित आहे. शहरांमध्ये वीज गेल्याने मोठी अडचण होती. लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात येताच त्यांनी स्वखर्चातून पाणी टँकरची व्यवस्था केली.स्वतः पुढाकार घेऊन सर्वांना पाणी मिळेपर्यंत ते थांबून होते.आंबेडकर नगर, म. फुले नगर, खाटीक गल्ली, मरगुबाई गल्ली या ठिकाणी पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला.या कामाबद्दल या भागातील लोकांनी बहुजन समाज पार्टीचे नेते संतोष (भैय्या)साबळे यांचे आभार मानले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद