लोकराज प्रतिष्ठाण,माळशिरस यांचे आयोजन
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस येथील लोकराज प्रतिष्ठाण यांच्या वतीने भाऊबीज दिवाळी आणि दिवाळी म्हटले की आला गोडवा, पण आहारात असा गोडवा वाढतो तसाच आपल्या विचारात गोडवा वाढवून तितकच महत्वाचे म्हणुन माळशिरस तालुक्यातील अधिका-यांचा स्नेह मेळावा व स्पर्धापरिक्षा करणाऱ्या युवकांसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.या सत्रात गुणवंत व यशवंत विद्यार्थी ,NEET व आणि कृषी संबंधित पदवी उत्तम स्कोअर यांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी कशाप्रकारचे नियोजन करावे? यावर मर्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख सत्कार मुर्ती व मार्गदर्शक शुभम जाधव (IPS), अल्ताफ शेख (IPS), बाबासाहेब वाघमोडे (उपजिल्हाधिकारी), विनायक लवटे (अप्पर सचिव), हरिदास सुळ (उपजिल्हाधिकारी), विष्णु कोळेकर (पशुसंवर्धन अधिकारी), गणेश वाघमोडे (API), अनिल माने (PSI), हरिश्चंद्र वाघमोडे (विभागीय वन अधिकारी), महेश ठवरे (न्यायाधिश), महेश शिंदे (जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख), सोपान राचकर (न्यायाधिश, भुमपरांडा), शरद खंडागळे (मंडल अधिकारी) या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर अधिकाऱ्यांनी त्यावेळी दिले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच लोकराज प्रतिष्ठाण माळशिरस हे गेली ५ वर्षे झाली अशाच प्रकारचे सत्र राबवत आहे. याचे उदिष्ट माळशिरस तालुक्यातून विविध क्षेत्रात आपला यशाचा या माध्यमातून झेंडा फडकवीने हा आहे. मुलांना योग्य दिशा देण्याचे कार्य केलं जात.
कारण या मुलांना योग्य मार्गदशन भेटलं तर ती मुले चांगल्या पदावर जातील आणि आपल्या माळशिरस तालुक्याचे नाव देशाच्या नकाशात चमकवतील हेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग (तात्या) वाघमोडे, डॉ.दत्तात्रय सर्जे, डॉ.दिलीप वाघमोडे, सोमनाथ कर्णवर-पाटील (API), गोविंद कर्णवर-पाटील, मच्छिंद्र गोरड, युवराजसिंह वाघमोडे आणि संजय वाघमोड यांनी या लोकराज प्रतिष्ठाण माळशिरसची स्थापना केली. गेली ५ वर्षे झाली ही यशस्वीरित्या चालु आहे आणि यापुढेही ही असेच चालू राहील.
सूत्रसंचालन धनाजी माने यांनी केले. आभार लोकराज प्रतिष्ठाण माळशिरसचे अध्यक्ष पांडुरंग (तात्या) वाघमोडे यांनी मानले.
व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, महादेव (तात्या) देशमुख, माजी सरपंच विकास धाईंजे, सरपंच विष्णू गोरड, अजय साहेबराव पाटील, अप्पासाहेब वाघमोडे, अमीर पठाण, नितीन गायकवाड, देवा वाघमोडे, जानकर आप्पा याच्यासह पदाधिकारी, सहकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कधी हार मानू नये.आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते निश्चित करा. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर चांगले व्हा,कोणाला इंजिनिअर व्हायचं असेल तर चांगले इंजिनिअर व्हा, कोणत्याही क्षेत्रात जा पण त्या क्षेत्रात उत्तम प्रकारे उतरून देश सेवा करा.मी स्वतः ४ परीक्षा इंटरव्ह्यूमध्ये ५,११,६ अशा मार्कने फेल झालो,चौथ्यादा तर ५५ मार्क्सने फेल झालो शेवटी पुन्हा नव्या जोमाने सुरवात केली व पाचव्या परीक्षेत सिलेक्ट झालो. याचा अर्थ माझ्या चार परीक्षा वाया नाहीत गेल्या कारण माझ्याकडून झालेल्या चूका सुधारता आल्या . आपल्या तालुक्याचं नाव पूर्ण भारतात झालं पाहिजे. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊच. बोलण्यातून पर्सनॅलिटी डेव्हलप करा. ग्रामीण भागातून आहे अस मनात आणू नका. लिखाणाची आणि वाचण्याची प्रॅक्टिस ठेवा. – शुभम जाधव IPS अधिकारी
कितीही मोठं व्हा पण आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू नका आणि कधी फेल झाला तर आत्महत्येचा विचार कधी करू नक,कारण तुमच्यावर आईवडिलांची स्वप्न असतात. एकदा,दोनदा,तीनदा….फेल झाला तर हार मानू नका, पुन्हा प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. आपल्या आईवडिलांची मान कधी खाली घालायला लावू नका. -अल्ताफ शेख, IPS अधिकारी

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद