
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस येथे भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक १० मध्ये दिवाळी निमित्त ५२३ जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांची घरेच्या घरे उध्वस्त झाली.मात्र प्रत्येक हाकेला साद देणारे सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे कर्तव्यदक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा दिवाळी निमित्त भेट देऊन हास्य आणले.कोरोना महामारीत अनेकांना ऐन दिवाळीच्या सणात प्रश्न पडला होता.कोरोनामुळे कोणतीही देवाणघेवाण उरली नव्हती. अशावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाप्रमाणे डॉ.आप्पासाहेब जनतेच्या मदतीला धावून आले.यावेळी पर्यावरण पूरक फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेशही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद