
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस /सांगली:
सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकच्यावतीने अहिल्यादेवी होळकर स्मारक,सांगली येथे महाराजा यशवंतराव होळकर यांनी हडपसरच्या लढ्यात मिळविलेल्या दिनाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी कृष्णा हुलवान, सौ.वैशाली हुलवान, सौ. रुक्मिणी कोळेकर, कु.साक्षी ओलेकर, कु.दिशा शिवशरण, कु.श्रावणी कोळेकर आणि कु.प्रतिभा ओलेकर यांनी होळकरशाहीचे ‘बांड’ निशाण तसेच हडपसर विजयदिन, महाराजांचा जयघोषाची १२x१४ फुट आकाराची रांगोळी रेखाटण्यात आली.
रांगोळी रेखाटनानंतर निवांत कोळेकर यांनी हडपसरचा रणसंग्राम आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीचे ऐतिहासिक योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक विष्णू माने यांनी महाराजा यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, सम्राट अशोक या महापुरुषांचे पुतळे तयार करुन त्यांच्या फोटोप्रतिमा, पुतळे, शहरातील चौकांस नावे देणे, तसेच या महापुरुषांचा इतिहास प्रत्येकापर्यंत गेल्यास त्यातुन स्फुर्तीप्रेरणा घेवून नवयुवक सामाजिक,राजकीय, शैक्षणिक आणि एकूण सर्वांगिण विकासाच्या प्रवाहात येईल अशा स्वरुपाचे विवेचन केले.
यावेळी सिद्धेश्वर ओलेकर,प्रा.अजित खरात,बिरु कोळेकर, दिलिप भिसे, प्रमोद बणसोडे, दयानंद शिवशरण, इंजि.अनिल कोळेकर आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद